अबुधाबी : विराट कोहली सध्याच्या आयपीएल हंगामानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुचे कर्णधार पद देखील सोडणार आहे. पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या टी -20 विश्वचषकानंतर त्याने भारतीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा याआोगदरच केली आहे.
विराट कोहली आपल्या संदेशात म्हटले की- आरसीबीचा कर्णधार म्हणून ही माझी शेवटची आयपीएल असणार आहे. मी माझा शेवटचा आयपीएल सामना खेळत नाही. तोपर्यंत आरसीबीचा खेळाडू राहीन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्व आरसीबीच्या चाहत्यांचे आभार मानतो, असे विराट म्हणाला आहे.

विराटला फलंदाजीवर करायचे लक्ष केंद्रित : भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देताना विराटने सांगितले होते की, तो कसोटी आणि एकदिवसीय संघाचे नेतृत्व करत राहील. विराटला आता फलंदाजीवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे. त्याचा फलंदाजीचा फॉर्म गेल्या दोन वर्षांत कमकुवत झाला आहे. त्याला बऱ्याच कालावधीत एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही.