नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या घरी पाळणा हलला आहे. आज विरूष्का जोडीला कन्यात्न प्राप्त झाली आहे, अशी माहिती विराट कोहलीने टि्वटकरून दिली आहे. तसेच, चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल विराट कोहलीने सर्वांचे आभार मानले आहे.
विराटने टि्वटमध्ये म्हंटले आहे की, आमच्या घरी मुलीचे आगमन झाल्याने आम्हाला खुप आनंद झाला आहे. तुम्हाला ही बातमी सांगताना खुप आनंद वाटतो आहे. आम्हाला चाहत्यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्दल आम्ही तुमचे सर्वांचे आभारी आहोत. अनुष्या आणि बाळाची तब्येत ठणठणीत आहे. आमचे सौभाग्य आहे की, आम्हाला अयुष्यात आई-वडील होण्याचे भाग्य लाभले आहे. तरी सर्वांना विनंती आहे, आम्हाला आमचा खाजगी वेळ द्यावा, असे विराटने टि्वटवर म्हंटले आहे.

— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021[removed][removed]