मुंबई: जगातील महान फलंदाज सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस काहीसा खास आहे. सचिन तेंडुलकरने याच दिवशी म्हणचे 31 वर्षांपूर्वी दिवशी सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तर सात वर्षांपूर्वी याच दिवशी आपला अंतिम सामना खेळून चाहत्यांना रडवले होते.
सचिन तेंडुलकरने 15 नोव्हेंबर 1989 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिनने आपल्या धडाकेबाज फलंदाजीने जागाला प्रभावित केले आहे. सचिनने अवघ्या 16 व्या वर्षी कराचीमधील नॅशनल स्टेडिअममध्ये पाकिस्तान विरूध्द कसोटीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता.
या कसोटी सामन्यात सचिनला केवळ 15 धावा करता आल्या होत्या. पाकिस्तानच्या वतीने पहिला सामना खेळत असलेला वकार युनिसने सचिनने बाद केले होते. हा सामना अनिर्णीत राहिल्यामुळे सचिनला दुसरी इनिंग खेळण्याची संधी आहे.
सचिनचा आणखी एक आज योगायोग आहे तो म्हणजे 2013 साली 15 नोव्हेंबरच्या दिवशीच सचिनने त्याचा अंतिम क्रिकेटचा सामना खेळला होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या वेस्ट इंडिज विरोधातील सामन्यात सचिनने 74 धावा केल्या होत्या. या सामन्यातही सचिनला दुसरा डाव खेळण्याची संधी मिळाली नाही. भारताने तो सामना एक डाव आणि 126 धावांनी जिंकला होता.
बीसीसीआय टि्वटकरत सांगितले आहे की, आजच्या दिवशीच 1989 साली सचिनने आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. 2013 साली याच दिवशी हा खेळाडू शेवटच्या वेळी मैदानात उतरला होता. जगभरातील लाखो लोकांना प्रेरित करण्यासाठी धन्यवाद.

जगातील महान फलंदाज सचिनने भारतासाठी 200 कसोटी आणि 463 वनडे सामने खेळलेले आहे. सचिनच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 शतकांची नोंद आहे. वनडे सामन्यात त्याने 18,426 धावा करत 49 शतक ठोकले असून कसोटी सामन्यात त्याच्या नावे 15,921 धावा आहेत त्यात 51 शतकांचा समावेश आहे.