नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ घोषीत करण्यात आलेला आहे. हा वर्ल्ड कप १७ ऑक्टोबरपासून अमिराती आणि ओमान येथे होणार आहे. या संघातून सलामीवीर शिखर धवन आणि युजवेंद्र चहल यांना अनपेक्षित डच्चू मिळालेला आहे. बुधवारी घोषीत करण्यात आलेल्या भारताच्या १५ सदस्यीय संघात अनुभवी रविचंद्रन अश्विनसह पंचतारांकित फिरकी माऱ्याची रचना केली गेली आहे. दरम्यान यावेळी देशाला सर्वाधीक सुखद धक्का मिळाला तो म्हणजे धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी महत्वाची चिंता व्यक्त केली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी टी-२० वर्ल्ड कपसाठी धोनीची नियुक्ती भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असल्याचे म्हटले आहे. पण याचवेळी त्यांनी डावपेच आखण्यावरुन रवी शास्त्री आणि धोनीमध्ये वादाची ठिणगी पडू नये, अशी अशा व्यक्त केली आहे. जर दोघांनीही एकत्रपणे काम केले तर संघासाठी खूप उपयुक्त ठरेल, असे गावसकर यांनी आजतकशी वृत्तवाहीनीशी बोलताना म्हटले आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११ चा वर्ल्ड कप जिंकला आहे. त्याआधई २००७ चा टी-२० वर्ल्ड कप जिंकलो आहोत. भारताला नक्कीच याचा फायदा होईल, असे गावसकर म्हणाले आहे.
सुनील गावसकर यांनी यावेळी २००४ मध्ये आपली सल्लागार म्हणून नियुक्ती केल्याचे उदाहरण दिले आहे. त्यावेळी मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या जॉन राइट हे थोडे चिंताग्रस्त होते.  त्यांना मी त्यांची जागा घेईन, असे वाटले होते. पण रवी शास्त्री यांना धोनीला प्रशिक्षणात जास्त रस नसल्याची कल्पना आहे. रवी शास्त्री आणि धोनीमधील भागीदारी चांगली झाल्यास भारताला खूप फायदा होईल, असा विश्वास गावसकरांनी व्यक्त केलेला आहे.
पण जर डावपेचावरुन आणि संघ निवडीवरुन दोघांमध्ये मतांतर झाले तर कदाचित याचा संघावर परिणाम होईल. पण धोनीची निवड ही भारतीय संघाला बळ देणारी ठरेल. त्याच्याकडे खूप अनुभव असून, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असताना त्याच्याइतका मोठा खेळाडू कोणी नव्हता, असे गावसकर यांनी सांगितले आहे.
धोनीची निवड ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी असली तरी यावरुन वाद होऊ नये अशी मी प्रार्थना करतो, असे शास्ञी यांनी म्हटले आहे. रवी शास्त्री आणि धोनीने एकत्र काम केलेतर भारतासाठी ही मोठी बातमी आहे, असे गावसकरांनी म्हटले आहे. गावसकरांनी यावेळी अश्विनला प्लेईंग ११ मध्ये संधी मिळेल का याबाबत शंका व्यक्त केली आहे. अश्विन जुलै२०१७ पासून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही, असे देखील शास्ञी यांनी स्पष्ट केले आहे.