मुंबई : कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणारा शुबमन गिलचे आणि सारा तेंडुलकरच्या अफेरची चर्चा सुरू असताना त्यातच सचिन तेंडुलकरनेही शुबमन गिलचे कौतुक केले आहे. त्यामुळे, सारा आणि शुबमन गिलच्या अफेरच्या चर्चेला आणखी उधाण आले आहे.

[removed][removed]


आयपीयलमधिल कामगिरीने शुभमनने सर्वच भारतीयांची मने जिंकली. त्यामुळे गिल याच्याकडे भारतीय संघाचा भविष्यातील सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. यासोबत आणखी एका गोष्टीसाठीही शुबमन जोरदार चर्चेत आहे, ती चर्चा म्हणजे मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक सारा हिचे आणि शुबमनचे अफेयर असल्याची चर्चा आहे. त्यातच मुंबईविरूद्धच्या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. पण या सामन्यातील क्षेत्ररक्षणात शुभमनने चांगली कामगिरी केली. त्या क्षणाचा व्हिडीओ सारा तेंडुलकरने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला होता. आणि त्यावर तीन हर्ट्सचे इमोजीदेखील वापरले होते. त्यामुळे या दोघांच्या अफेयरच्या चर्चांना उधाण आले होते. याचदरम्यान, सचिनने शुबमनच्या पाठिवर कौतुकाची थाप देणार एक ट्विट केले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात शुबमनने अतिशय उपयुक्त खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर सचिनने त्याचे कौतुक करणारे एक ट्विट केले. शुबमन गिलची अप्रतिम खेळी असे त्याने ट्विट केले. त्यासोबत आंद्रे रसल, इयॉन मॉर्गन आणि कोलकाताच्या संपूर्ण संघाचंही सचिनने कौतुक केले आहे. त्यामुळे, सारा आणि शुबमन गिलच्या अफेरच्या चर्चेला आणखी उत आला आहे. घटनेआधीही शुबमन आणि सारा या दोघांनी एकाच वेळी “I SPY” असे कॅप्शन लिहून आपापले फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तेव्हाही दोघांमध्ये काहीतरी शिजतंय की काय अशी चर्चा सोशल मीडियावर झाली होती.