दुबई : 'आयपीएल'चा उर्वरित हंगाम आजपासून सुरू होणार आहे. पहिला सामना रोहित आणि धोनीमध्ये रंगणार आहे. पहिल्या लढतीत मुंबईची चेन्नईशी गाठ आहे.जैव-सुरक्षित वातावरणाचे चक्रव्यूह भेदून कोरोनाने शिरकाव केल्यामुळे ४ मे रोजी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या १४व्या हंगामाचा डाव अर्ध्यावरती मोडला होता. आता जवळपास साडेचार महिन्यांनंतर ‘आयपीएल’चा दुसरा डाव रविवारपासून पुन्हा सुरू होणार असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहे. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने ही लीग फार महत्त्वाची ठरणार असून, प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लागणार आहे.

 वेळ : सायंकाळी ७.३० वा.
 थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर्स १, स्टार स्पोटर्स १ हिंदी (एचडी वाहिन्या)