नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडच्या खाद्यावर आता भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मोठी जबाबदारी टाकणार आहे. राहुल द्रविड भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होण्यास सहमत झाले आहे. श्रीलंकेविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत राहुल द्रविडने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहिले होते. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -२० वर्ल्डकपनंतर संपत आहे. टी २० वर्ल्डकपनंतर द्रविड भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारणार आहे, असे एका वृत्तवाहीनेने स्पष्ट केले आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सूत्रांनी सांगितले आहे की, द्रविडने प्रशिक्षक होण्यास संमती दिलेली आहे. यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही, असे देखील द्रविडने स्पष्ट केले आहे. विक्रम फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहे. भारतीय संघ आता बदलाच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट होत आहे. अनेक युवा खेळाडूंना यात सहभागी व्हायचे आहे. या सर्वांनी द्रविडसोबत काम केले आहे. भारतीय क्रिकेटसाठी हे खूप महत्त्वाचे असू शकते. राहुल द्रविड हा नेहमीच बीसीसीआयचा पर्याय होता.यासह, द्रविडचा विश्वासू सहकारी पारस म्हांब्रेची गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तो भरतची जागा घेणार आहे. तर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्या बदलीबाबत कोणताही निर्णय झालेला आहे. विक्रम राठोड संघाचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून कायम राहणार आहे.