नवी दिल्ली : आयपीएल २०२१ स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघात लढाई रंगणार आहे.  मुंबईतील वानखेडे मैदानात हा सामना होणार आहे. बंगळुरुची या आयपीएल हंगामात चांगली सुरुवात झाली आहे. बंगळुरुने आतापर्यंत एकही सामना गमावला नाही. त्यामुळे या सामन्यात राजस्थानला पराभूत करून विजयी चौकार लावण्यासाठी विराटसेना सज्ज आहे.  राजस्थान विरुद्धचा सामना जिंकून पुन्हा एकदा गुणतालिकेत अव्वल स्थानी येण्याचे बंगळुरुचे लक्ष्य असणार आहे. तर राजस्थानचा संघ तीन पैकी एका सामन्यातच विजय मिळवू शकला आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्याचे संघावर दडपण असेल.
आयपीएल कारकिर्दीत बंगळुरु आणि राजस्थान हे दोन संघ २२ वेळा आमनेसामने आले आहेत. दोघांनी १०-१० सामने जिंकले आहेत. तर दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ बंगळुरुची विजयी घोडदौड थांबवणार का? याकडे लक्ष लागून आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, देवदत्त पडिक्कल, युजर्वेंद्र चहल, मोहम्मद सिराज. केन रिचर्डसन, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे, जोशुआ फिलिप, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, अॅडम जाम्पा, कायल जेमिसन, रजत पाटिदार, सचिन बेबी, मोहम्मद अझरुद्दीन, डेन ख्रिश्चन, केएस भरत, सुयश प्रभुदेसाई, डॅनिअल सॅम्स आणि हर्षल पटेल

राजस्थान : संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेविड मिलर, राहुल तेवतिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाळ, मयंक मार्कंडेय, अँड्र्यु टाय, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्ताफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करियप्पा, कुलदीप यादव आणि आकाश सिंह