मुंबई : इंडियन प्रीमियर लीगची फ्रेंचायझी टीम मुंबई इंडियन्सचा क्रिकेटपटू आणि क्रिकेटचा देव अशी ओळख निर्माण करणाऱ्या सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर स्पर्धेबाहेर झालेला आहे. दुखापतीमुळे तो एकही सामना न खेळता आयपीएलच्या १४ व्या हंगामाबाहेर झाला आहे. मुंबई इंडियन्सने याबाबत माहिती दिली आह. त्याच्या जागी गोलंदाज सिमरजीत सिंगला संघात स्थान देण्यात आले आहे.
दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला आयपीएलमध्ये मुंबईकडून खेळताना पाहण्याच्या चाहत्यांच्या आशांना धक्का बसलेला आहे. मागील वर्षी झालेल्या लिलावात अर्जुनला २० लाखांची बोली लावत मुंबईने आपल्या ताफ्यात समाविष्ट केले होते. दुखापतीमुळे तो यापुढे स्पर्धेच्या सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.