दुबई : आयसीसीने आज सोमवारी क्रिकेट पुरस्कार विजेत्यां खेळाडूंची नावे जाहीर केली आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीला 'सर गारफिल्ड सोबर्स मेल क्रिकेटर ऑफ द डेकेड' (2011-2020) आणि 'वन डे प्लेअर ऑफ द डेकेड' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर, भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड ऑफ द डेकेड' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.


विरोट कोहलीने  2011 ते 2020 पर्यंत टेस्ट, वनडे आणि टी-20 त 20 हजार 396 धावा केल्या आहेत. यात विरोटने  66 शतके आणि 94 अर्धशतके झळकावली आहे. कोहलीने यादरम्यान 70 डावात 56.97 च्या सरासरीने धावा केल्या. तो 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. तर केवळ वनडेत कोहलीने या दशकात 61.83 च्या सरासरीने 10 हजारांपेक्षा जास्त धावा काढल्या. या दरम्यान त्याने 39 शकते आणि 48 अर्धशतके केली. मागील 10 वर्षांत वनडेत त्याने 112 झेल टिपले.

स्मिथ या दशकातला सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू : ऑस्ट्रेलियन खेळाडू स्टीव्ह स्मिथला 'टेस्ट प्लेअर ऑफ द डेकेड' देण्यात आला आहे. स्मिथने 2011 ते 2020 दरम्यान कसोटी सामन्यात 65.79 च्या सरासरीने 7040 धावा केल्या. यावेळी, त्याची सरासरी सध्याच्या कसोटीतील टॉप -50 फलंदाजांमधील सर्वोच्च आहे. या दरम्यान त्याने 26 शतके आणि 28 अर्धशतके झळकावली आहे.

राशिद दशकातला सर्वोत्कृष्ट टी -20 क्रिकेटपटू : अफगानिस्तानच्या राशिद खानला आयसीसीने पुरुष 'टी-20 क्रिकेटर ऑफ द डेकेड' पुरस्काराने गौरवीले आहे. त्याने या दशकात टी-20 मध्ये सर्वाधिक 89 गडी बाद केले. यादरम्यान त्याची सरासरी 12.62 होती. त्याने 3 वेळा चार आणि 2 वेळा 5 गडी बाद केले.

धोनीला 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' पुरस्कार : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला  'आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड' ने सन्मानित करण्यात आले आहे. धोनीने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत इयान बेल धावबाद झाल्यानंतरही त्याला मैदानात परत बोलावले होते. चाहत्यांनी याच भावनेसाठी त्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.