नवी दिल्ली - भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. छातीत दुखू लागल्यामुळे कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल केले होते.

हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे ६१ वर्षीय कपिल देव यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले, की कपिल देव यांना रविवारी दुपारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधार असून ते लवकरच आपले दैनंदिन कामकाज सुरु करु शकतात. कपिल देव यांना डिस्चार्ज देण्यापूर्वी माजी भारतीय वेगवेग गोलंदाज चेतन शर्माने टि्वटवर एक फोटो शेअर करुन याबाबत माहिती दिली.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत. फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हार्ट डिसीज विभागाचे संचालक अतुल माथूरने त्यांच्यावर कोरोनरी अँजिओप्लास्टी केली. २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर त्यांचा पहिला फोटो माजी भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्माने शेअर केला होता.

कपिल देव यांचे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने 37 वर्षांपूर्वी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता. त्यांनी ४०० पेक्षा जास्त विकेट्स घेत कसोटी सामन्यांत ५ हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

[removed][removed]