(संग्रहित छायाचिञ)
मुंबई : आयपीएलचा १४ वा हंगाम ९ एप्रिलपासून म्हणजे (उद्या) सुरू होणार आहे. पहिल्या सामना मुंबई इंडियन्स आणि  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये रंगणार आहे. आयपीएल २०२१ चा हा सलामीचा सामना विराट विरूध्द रोहित होणार आहे. त्यामुळे, विराटचे फॅन्स आणि रोहितचे फॅन्स उद्याच्या पहिल्या सामन्याकडे टक लावून बसले आहे. 
आयपीएल २०२१ च्या माध्यमातून दोन वर्षानंतर ही स्पर्धा भारतात परतली आहे.  आयपीएल २०१९ ही स्पर्धा भारतीय भूमीवर खेळवण्यात आली होती. तर आयपीएल २०२० ही स्पर्धा कोरोना साधीच्या रोगामुळे यूएईमध्ये झाली होती. मात्र, दोन वर्षानंतर भारतात परतणार्‍या या स्पर्धेची सुरुवात पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पराभवाने होऊ शकते, असा दावा आजवरचा इतिहास पाहून करण्यात आला आहे. 

पहिला सामना हारण्याचा मुंबईचा इतिहास : सलामीच्या सामन्यात मुंबईचा संघ हारतो, हे इतिहास सांगतो आहे. कारण, मुंबई इंडियन्सने २०१३ पासून आतापर्यंत एकदाही स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकलेला नाही. आयपीएल २०१३ च्या मोसमातही मुंबईला आरसीबीच्या हातून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा त्या सामन्यात रिकी पॉन्टिंग मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. जसप्रीत बुमराहने याच सामन्याद्वारे आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. २०१३ पासून आतापर्यंत आयपीएलचे ७ हंगाम संपुष्टात आले आहे. परंतु मुंबई इंडियन्सने आजपर्यंत आयपीएलचा सलामीचा सामना जिंकलेला नाही. अशा परिस्थितीत आता ८ व्या हंगामात तरी हा इतिहास बदलतो की त्याची पुनरावृत्ती होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबई जेतेपदाची हॅटट्रिक करणार? : रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार बनला आहे. त्याच्या नेतृत्वात मुंबईने ५ वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आहे.  २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० च्या स्पर्धेचे जेतेपद मुंबईने पटकावले आहे. यंदा ही स्पर्धा जिंकून विजेतेपद मिळवण्याची हॅटट्रिक करायची, असा मनसुबा मुंबईच्या संघाने आखला आहे. ९ एप्रिलला ही स्पर्धा सुरु होत आहे. मुंबईचा पहिला सामना विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरोधात खेळावी लागणार आहे. यंदा आयपीएलमध्ये एकूण ५६  लीग सामने खेळवले जातील. सर्व सामने चेन्नई, कोलकाता, बंगळुरु, मुंबई आणि अहमदाबाद येथे होणार आहेत.