यूएई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील एलिमिनेटर सामना रॉयल चॅलेंजर्स बँगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. 
कोलकाताचं नेतृत्व इयॉन मॉर्गन करणार आहे. तर विराट बंगळुरुची कॅप्टन्सी करणार आहे. क्लालिफायर 2 मध्ये पोहचण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम्सचा कस लागणार आहे. जो संघ हारेल तो थेट घरी जाणार आहे. त्यामुळे, हा सामना कडक होणार आहे.