चेन्नई : कोरोना संकटात आयपीएलचा धुमधडाका सुरू आहे. आज आयपीएलच्या 18 व्या सामन्यात अशा दोन टीम आमने सामने असणार आहेत की ज्या संघांना विजयाची गरज आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात लढत होणार आहे. कोलकाता आणि राजस्थानने आतापर्यंत 4 मॅचेस खेळल्या आहेत. त्यापैकी केवळ 1 मॅच जिंकली आहे. मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरला पाठीमागील मॅचमध्ये चेन्नईकडून 18 रन्सने पराभव स्वीकारावा लागला आहे. तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानला बंगळुरुने 10 विकेट्सने पराभूत केले आहे. पाठीमागील इतिहास विसरुन दोन्ही संघ आता विजयाच्या ट्रॅकवर येण्यासाठी आतुरता आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सची समस्या एकसारखीच आहे. दोन्ही संघांच्या चॉप ऑर्डर्स चमकदार कामगिरी करण्यास आतापर्यंत अपयशी आहेत. तर दोन्ही संघांचे बोलर्स भरपूर रन्स देऊन विकेट्स घेण्यात अपयशी आहे. कोलकात्याने पाठीमागील सामना जवळपास जिंकला होता पण अखेरच्या काही षटकांमध्ये धावगती वाढली नाही परिणामी चेन्नईने कोलकात्यावर 18 रन्सने मात केली. तर दुसरीकडे राजस्थानची टीम बंगळुरुला जराशीही टक्कर देऊ शकली नाही. बंगळुरुने राजस्थानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला आहे.
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील पहिला आणि आयपीएलच्या 14 व्या पर्वातील 18 वा सामना आज 24 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार सामना ठीक 7.30 वाजता सुरु होईल. सामन्याच्या अर्धा तास अगोदर म्हणजेच ठीक 7 वाजता सामन्याच्या टॉस होईल.