मुंबई : आयपीएलचा १४ वा हंगाम सुरू झाला आहे. काल झालेल्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विजय मिळवला आहे. आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जचा महेंद्रसिंह धोनी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सचा ऋषभ पंत यांच्यात म्हणजे गुरू विरुद्ध युवा शिष्य असा रंगणार आहे. शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) लढतीत विजयी सलामी नोंदवण्यासाठी दोन्ही संघ उत्सुक आहेत.
संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या मागील हंगामात दिल्लीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या हंगामाला सकारात्मक प्रारंभ करून जेतेपदाचे स्वप्न साकारण्याचा निर्धार दिल्ली संघाने केला आहे. तीन वेळा विजेत्या चेन्नईसाठी मागील हंगाम झगडणारा ठरला होता. त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली होती. ते अपयश मागे टाकण्यासाठी चेन्नई संघ सज्ज झाला आहे.
दुखापतीमुळे श्रेयस अय्यरने माघार घेतल्यामुळे यष्टिरक्षक-फलंदाज पंतकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. धोनीकडून शिकलेल्या धड्यांना आता अजमावता येईल, अशी ग्वाही पंतने नुकतीच दिली होती. "कर्णधार म्हणून माझा पहिलाच सामना धोनीविरुद्ध आहे. मी त्याच्याकडून बरेच शिकलो आहे. त्यामुळे हा सामना माझ्यासाठी महत्त्वाचा असेल," असे पंतने म्हटले होते.

दिल्ली : ऋषभ पंत (कर्णधार), अजिंक्य रहाणे, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टोइनिस, पृथ्वी शॉ, शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, अक्षर पटेल, अमित मिश्रा, उमेश यादव, कॅगिसो रबाडा, आनरिख नॉर्किए, शिम्रॉन हेटमायर, टॉम करन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स, आवेश खान, रिपल पटेल, प्रवीण दुबे, लुकमन मेरिवाला, एम. सिद्धार्थ, विष्णू विनोद, ललित यादव.

चेन्नई  : महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, फॅफ ड्यू प्लेसिस, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, मोईन अली, रवींद्र जडेजा, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, मिचेल सँटनर, लुंगी एन्गिडी, कर्ण शर्मा, कृष्णप्पा गौतम, सॅम करन, जेसन बेहरेंड्रॉफ, इम्रान ताहिर, भगत शर्मा, हरिशंकर रेड्डी, सी. हरी निशांत, नारायण जगदीशन, के. एम. आसिफ, आर. साईकिशोर, भगत वर्मा.