शारजा : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 28 वा सामना आज 12 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी शारजात खेळला जाणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात रंगणार आहे.
बंगळुरुने यंदाच्या मोसमात 6 सामने खेळले आहेत. यापैकी 4 सामन्यात बंगळुरुचा विजय झाला आहे. बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या बाजूला कोलकाताने खेळलेल्या 6 पैकी 4 सामन्यात विजय मिळवला आहे. नेट रनरेट चांगला असल्याने कोलकाता पॉइंट्सटेबलमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर आहे.