बुधाबी: आयपीएलमध्ये आजची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात अबुधाबीच्या शेख जायद स्टेडियमवर होणार आहे. एकिकडे रोहीत शर्मा आहे, तर दुसरीकेडे स्टीव्ह स्मिथ आहे.या दोघांमधील ही पहिली लढत आहे.
राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. तर मुंबई इंडियन्सने या स्पर्धेचे सर्वाधिक चार वेळा विजेतेपद मिळवले आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत २१ लढती झाल्या असून त्यापैकी १० मुंबई आणि १० राजस्थानने जिंकल्या आहेत. एक सामना रद्द करण्यात आला होता.
या वर्षी दोन्ही संघांची कामगिरी शानदार झाली आहे. कामगिरीचा विचार करता राजस्थान रॉयल्सचे पारडे जड वाटत आहे. पण शारजामधील पहिल्या दोन लढतीत धमाकेदार फलंदाजी केल्यानंतर दुबई आणि अबुधाबीमध्ये राजस्थानची कामगिरी निराशजनक झाली आहे. यामुळेच राजस्थान या सामन्यात बदल करण्याची शक्यता आहे. या उलट मुंबई इंडियन्सची कामगिरी या दोन मैदानावर चांगली झाली आहे.