शारजा : आयपीएल २०२० चे साखळी फेरीतील सामने अंतिम टप्प्यात आहे. आज सोमवारी प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याठी पंजाब विरूध्द कोलकाता सामना रंगणार आहे. कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करताना किंग्ज इलेव्हन पंजाब सलग पाचवा विजय नोंदवण्यासाठी उत्सुक आहे.

पंजाब संघाने ११ सामन्यांतून पाच विजय आणि सहा पराभवांसह १० गुण आहेत. याउलट कोलकात्याचे ११ सामन्यांतून सहा विजय आणि पाच पराभव यांच्यासह १२ गुण आहेत. कोलकाता चौथ्या आणि पंजाब पाचव्या स्थानी आहे. जर कोलकाताविरुद्धच्या लढतीत विजय मिळवता आला तर पंजाबला चौथे स्थान मिळवता येईल. याउलट कोलकाता जिंकला तर चौथे स्थान त्यांना राखता येईल. बाद फेरीसाठीची चुरस तीव्र होत असताना उभय संघांना पराभव परवडणारा नाही.
आज कोलकाता नाईट रायडर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात सामना रंगणार आहे. आज सांयकाळी ७.३० वाजता हा सामना शारजा येथे होणार आहे. शारजातील पिचवर बॉल फसून येत असल्याने फलंदाजांची करताना चांगलीच तारंबळ उडणार आहे.