दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात आज डबल हेडर सामने खेळले जाणार आहे. यातील दुसरा सामना गुरुशिष्यांचा रंगणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.
विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी यांच्यात आज सामना रंगणार आहे. चेन्नईला यंदाच्या मोसमात विशेष काही करता आलेले नाही. चेन्नई सातत्याने निराशाजनक कामगिरी करत आहे. चेन्नईने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यातातून फक्त 2 सामन्यात विजय मिळवता आला आहे. चेन्नई 4 पॉइंट्ससह 6 व्या क्रमांकावर आहे. तर बंगळुरुने 5 पैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुने पॉइंट्संटेबलमध्ये 5 व्या क्रमांकावर आहे.