अबुधाबी : चेन्नई संघाचे फलंदाज पुन्हा एकदा फोल ठरले आहेत. काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला राजस्थान रॉयल्सपुढे विजयासाठी १२६ धावांचे माफक आव्हान ठेवता आले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थान सुरुवातीला तीन धक्के बसले. राजस्थानची ३ बाद २८ अशी अवस्था झाली होती. माञ, त्यानंतर राजस्थानच्या जोस बटलरने अर्धशतक साकारत राजस्थान संघाला 'रॉयल' विजयी मिळवून दिला.


चेन्नईने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात चेन्नईला चांगली सुरुवात करता आली नाही. चेन्नईचे फॉर्मात असलेले फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस आणि शेन वॉटसन लवकर बाद झाले. पण सॅम करनने यावेळी थोडी चांगली फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. सॅमने यावेळी २२ धावा केल्या. यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने चांगली फलंदाजी केली. या सामन्यात जडेजाने अखेरच्या षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी केली. त्यामुळेच चेन्नईला या सामन्यात राजस्थानपुढे १२६ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारता आली. जडेजाने यावेळी चार चौकारांच्या जोरावर नाबाद ३५ धावांची खेळी साकारली चेन्नईच्या १२६ धावांच्या माफक आव्हानाचा सामना करताना राजस्थान संघाची सुरूवातील घरगुंडी झाली. चेन्नईच्या दीपक चहर आणि जोश हेझलवूड या दोघांनी आपल्या पहिल्या स्पेलमध्ये भेदक मारा केला. राजस्थानला यावेळी पहिल्या पाच षटकांमध्ये आपले तीन फलंदाज गमवावे लागले होते. पहिल्या पाच षटकांमध्ये राजस्थानची ३ बाद २८ अशी धावसंख्या झाली होती. पण त्यानंतर कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि जोस बटलर यांची जोडी चांगलीच जमलेली पाहायला मिळाली. या दोघांनी यावेळी मोठा भागीदारी रचली आणि त्यामुळेच राजस्थानचा विजय झाला.