दुबई : आयपीएलच्या 13 हगांमातील 'प्ले-ऑफ्स'ची पहिली लढत मुंबई इंडियन्स विरूध्द दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार आहे. हा सामना उद्या ५ नोव्हेंबर, गुरूवार रोजी दुबई येथे होणार आहे.

[removed][removed]

आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभूत करत 'प्ले-ऑफ्स' मध्ये दणक्यात प्रवेश केला.
या सामन्याअंती स्पर्धेला टॉप 4 संघ मिळाले. मुंबईने साखळी सामन्याअंती १८ गुणांसह अव्वलस्थान कायम राखले. दिल्लीने १६ गुणांसह दुसरे स्थान पटकावले. बंगळुरूच्या संघाने प्ले-ऑफ्समध्ये स्थान पटकावले, पण हैदराबादची धावगती जास्त असल्याने त्यांना तिसरे स्थान मिळाले आणि बंगळुरूला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले आहे.

अशी असेल प्ले-ऑफ्सची लढाई :

५ नोव्हेंबर, गुरूवार – पहिली पात्रता फेरी १ – मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स (दुबई)

६ नोव्हेंबर, शुक्रवार – बाद फेरी – सनरायझर्स हैदराबाद vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (अबु धाबी)

८ नोव्हेंबर, रविवार – दुसरी पात्रता फेरी – मुंबई-दिल्ली सामन्यातील पराभूत संघ vs हैदराबाद-बंगळुरू सामन्याचा विजेता (अबु धाबी)

१० नोव्हेंबर – अंतिम सामना – मुंबई दिल्ली सामन्याचा विजेता vs दुसऱ्या पात्रता फेरीतील विजेता (दुबई)