शारजा : आयपीएलच्या 13 व्या मोसमात आज डबल हेडर सामने खेळले जात आहे. या डबल हेडरमधील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जस यांच्यात शारजा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी रंगणार आहे.
दिल्ली कॅपिटल्सने यंदा दमदार कामगिरी केली आहे. दिल्लीने आतापर्यंत एकूण 8 सामने खेळले आहेत. यापैकी 6 सामन्यात दिल्लीचा विजय झाला आहे. तर केवळ 2 सामन्यातच पराभवाचा सामना करावा लागला आहे. दिल्ली पॉइंट्सटेबलमध्ये 2 ऱ्या क्रमांकावर आहे. तर 3 वेळा जेतेपद पटकावलेल्या चेन्नईने यंदाच्या मोसमात निराशानजक कामगिरी केली आहे. चेन्नईने खेळलेल्या 8 सामन्यांपैकी फक्त 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 5 सामन्यात पराभव झाला आहे. चेन्नई अंकतालिकेत 6 व्या क्रमांकावर आहे.