अबूधाबी :  आयपीयलच्या 13 व्या सीझनमध्ये आज 47व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सनरायझर्स हैदराबाद भिडणार आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी एक पाऊल दूर असणाऱ्या दिल्ली आज हैदराबादशी झुंजणार आहे. त्यामुळे, हा सामना अधिकच रंगतदार होणार आहे.
आज दिल्ली कॅपिटल्स विरूध्द सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. सनरायझर्सला प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहायचे असेल तर आजचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे गरजेचे आहे. त्यामुळे हैदराबादसाठी आज करो या मरो अशी परिस्थिती आहे. तर दिल्लीचे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी घोडदौड करणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा संभाव्य संघ : अजिंक्य रहाणे/पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरन हेटमायेर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कागिसो रबाडा, एनरिक नॉटर्जे आणि तुषार देशपांडे

सनराइजर्स हैदराबादचा संभाव्य संघ : डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, मनीष पांडे, प्रियम गर्ग, विजय शंकर, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, संदीप शर्मा, टी नटराजन आणि खलील अहमद