दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना राजस्थान रॉयल्स यांच्या सामना दुबईतील शेख झायेद स्टेडियमवर सायंकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. या हंगामात दुसऱ्यांदा हे दोन संघ आमनेसामने आले आहेत. यापूर्वी शारजात हे दोन संघ समोरासमोर आले होते. या दोघांमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा पराभव केला होता.
पॉईंट टेबल्समध्ये चेन्नई तीन विजयासह सातव्या क्रमांकावर आहे. तर राजस्थान तीन विजयासह आठव्या क्रमांकावर आहे. आजच्या सामन्यात जिंकणारी टीम पाचव्या क्रमांकावर जाईल.
अबू धाबीमधील शेख झायेद आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम शारजा क्रिकेट स्टेडियमच्या तुलनेत पूर्णपणे वेगळे आहे. शारजाचे मैदान लहान असून त्यापेक्षा शेख झायेद स्टेडियम आकाराने हे बर्‍यापैकी मोठे मैदान आहे. परंतु येथे फिरकी गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते.