चेन्नई सुपरकिंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सामना रंगणार आहे. दोंन्ही संघासाठी आजची लढत महत्वाची मानली जात आहे. या सामन्यातील विजेत्यास लीगमधील आपले आव्हान कायम ठेवता येईल.
चेन्नईचा संघ सात सामन्यांतून चार गुण घेऊन सातव्या स्थानी आहे. त्याशिवाय हैदराबादविरुद्धच्या मागील लढतीत त्यांना सात धावांनी पराभव पत्करावा लागला होता. सलामीवीर शेन वॉटसन आणि फॅफ डय़ू प्लेसिस त्यांच्यासाठी सातत्याने योगदान देत असले तरी मधल्या फळीत धोनीसह अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा यांना कामगिरी उंचावण्याची गरज आहे. केदार जाधवच्या जागी गेल्या लढतीत एन. जगदीशनला स्थान देण्यात आले होते. परंतु तोही फारसा प्रभाव पाडू शकला नाही.
चेन्नई आणि हैदराबाद संघासाठी हा सामना जवळपास करा वा मरा सारखाच आहे. यातूनच या सामन्यात दोंन्ही संघ आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्यानेच मैदानावर झुंज देणार आहेत. त्यामुळे या दोंन्ही संघातील हा सामना अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.

 * सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.