अबुधाबी : धोनीची चेन्नई एक्सप्रेस गाडी रूळावर परतली आहे. सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाने १० गडी राखत पंजाबवर विरूध्द दणदणीत विजय मिळवला.पंजाबने चेन्नईला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली.


मागिल तीन सामण्यात चेन्नई संघाने खराब कामगिरी केल्यामुळे त्याच्यावर टीका होत होत्या. आमची फलंदाजी आणि गोलंदाजी चांगली होत नसल्यांची कबुली धोनी दिली होती. माञ, पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने चांगली कामगिरी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.पंजाबविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या सलामीवीरांना पहिल्यांच सूर गवसलेला पाहायला मिळाला. त्यामुळे या दोन्ही सलामीवीरांच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने पंजाबवर मोठा विजय साकारला. या सामन्यातून चेन्नईचा नाद करायचा नाही, असंच या दोन्ही सलामीवीरांनी अन्य संघाला दाखवून दिले आहे. फॅफने यावेळी ५३ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८७ धावांची खेळी साकारली, तर वॉटसनने ५३ चेंडूंत ११ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ८३ धावा केल्या.


कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबच्या संघाला चेन्नईपुढे १७९ धावांचे आव्हान ठेवता आले. पंजाबच्या १७९ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने भन्नाट सुरुवात केली. शेन वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिस या दोन्ही सलामीवीरांनी यावेळी अर्धशतके साजरी केली आणि संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केल्याचे पाहायला मिळाले. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये चेन्नईचा चांगली सलामी मिळालेली नव्हती. पण या सामन्यात पहिल्यांदाच चेन्नईला शतकी सलामी मिळाल्याचे पाहायला मिळाले. वॉटसन आणि फॅफ यांनी चांगली रणनिती आखत पंजाबच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.