मुंबई : टी 20 वर्ल्ड कप झाल्यानंतर भारतीय संघात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसे संकेत विविध विधानातून मिळत आहे. आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला वन डे आणि टी 20 च्या कर्णधार पदावरुन मुक्त करणार आहे, असे वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यानंतर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री  हे सुद्धा टी 20  विश्वचषक संपल्यानंतर पद सोडणार आहे, असे वृत्त झळकले आहे. टी 20 विश्वचषकानंतर रवी शास्त्री यांचा करार संपणार आहे. मात्र हा करार पुढे वाढवण्यास शास्त्री उत्सुक नाही, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे, आता प्रशिक्षक पदी राहुल द्रविडच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे. 
टी 20 विश्वचषकानंतर भारतीय संघ मोठ्या बदलाला सामोरे जाणार हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे प्रशिक्षकपदासाठी आता भारतीय संघाची ‘वॉल’ राहुल द्रविडचे नाव चर्चेत आहे. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीनेही तसे संकेत दिलेले आहे.