चेन्नई : भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी मालिका सुरू आहे. पहिला कसोटी सामना चेन्नई येथे सुरू असून चौथ्या दिवशी इंग्लंडचा संघ दुसऱ्या इनिंगमध्ये १७८ धावांवर ऑलआउट झाला असून भारताला जिंकण्यासाठी ४२० धावांची गरज आहे. दरम्यान,चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने  १ विकेट गमावून ३९  धावा केल्या आहे. पहिला सामना जिंकण्यासाठी पाहुण्यांना ९ विकेट्सची गरज असून भारताला अद्यापही ३८१ धावांची गरज आहे. शेवटचा दिवस पाहुण्यांसाठी फलदायी ठरणार की भारतासाठी हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघानं फॉलोऑन न देता दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावांत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखले आहे. दोन्ही डावांत इंग्लंड संघाकडे ४१९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांची आवशकता आहे. दुसऱ्या डावात फिरकीपटू आर. अश्विन याने सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमला दोन तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघानं २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंड संघानं पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक जण फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे. दिग्गज फलंदाजाच्या साथीला शुबमन गिल, पंत आणि सुंदर यासारखे नवखे फलंदाजही आहेत.

दरम्यान,इंग्लंडने भारताला ४२० धावांचे आव्हान दिले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने १ विकेट गमावून ३९ धावा केल्या. रोहित शर्मा १२ रन काढून जॅक लीचच्या बॉलवर आउट झाला आहे. तर, चेतेश्वर पुजारा १२ रन आणि शुभमन गिल १५ धावांवर नॉटआउट आहेत. विजयासाठी भारताला अखेरच्या दिवशी ३८१ धावांची गरज आहे. 

[removed][removed]