मँचेस्ट : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघ सध्या मालिकेत २-१ने आघाडीवर आहे. नॉटिंगहॅममध्ये खेळलेला पहिला सामना अनिर्णित राहिला आहे. यानंतर भारतीय संघाने लॉर्ड्सवर जबरस्त विजय मिळवला होता. भारतीय संघाला लीड्समध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर चौथ्या सामन्यात विराट सेनेने शानदार पुनरागमन केले अन् ओव्हल कसोटी सामना जिंकलेला आहे. आता भारताला मँचेस्टरच्या मैदानावर खेळावे लागेल जिथे त्यांनी आतापर्यंत एकही कसोटी जिंकलेली नाही.
पाचवा कसोटी सामना १० ते १४ सप्टेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. जरी भारतीय संघ हा सामना हरला तरी, ते मालिका गमावणार नाहीये. पण भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करेल. २००७ पासून भारतीय संघ इंग्लंडच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकलेला नाही. इंग्लंडने विजय मिळवल्यास मालिका २-२ अशी बरोबरीत सुटेल. भारताने आतापर्यंत मँचेस्टरमध्ये ९ कसोटी सामने खेळलेले आहे. यादरम्यान त्यांना २०१४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. पाच सामने अनिर्णित राहिले आहेत.
जर भारतीय संघाने मँचेस्टरमध्ये प्रथमच विजय मिळवला तर तो इतिहास घडणार आहे. भारतीय संघाने १९३६ मध्ये पहिल्यांदा या मैदानावर खेळायला आली होती. त्यानंतर ती सामना अनिर्णित करण्यात यशस्वी झाली होती. त्या वेळी इंग्लंडमध्ये बरोबरी मिळवणे विजयाएवढे मानले जात होते. यानंतर १९४६ मध्ये खेळलेली कसोटीही अनिर्णित राहिली. १९५२ मध्ये भारताला येथे पहिला पराभव मिळाला.मँचेस्टरमध्ये २०१४मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला येथे एका डावाने पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विराट कोहली आणि कंपनी बदला घेण्यास नक्की उत्सुक असेल.