सिडनी : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. भारीतय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढण्यासाठी भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली सज्ज आहे. भारतीय संघाच्या गोलंदाजांवर ऑस्ट्रेलिया संघाची करडी नजर आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारतीय गोलंदाजांना विविध प्रतिक्रिया व्यक्त करून डिवचण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी भारतीय संघाच्या गोलंदाजाना डिवचंल आहे. जस्टिन लॅंगर म्हणाले की, आम्ही भारतीय गोलंदाजाचा सन्मान करतो. भारतीय गोलंदाजांचा सामना आम्ही केला आहे. त्यामुळे, भारतीय गोलंदाजांचा खडान खडा आम्हाला माहिती आहे, असे विधान अस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी केले आहे.
व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लॅंगर बोलत होता. ते पुढे म्हणाले की, भारतीय संघाकडे चांगले गोलंदाज आहे. परंतु, या गोलंदाजांचा भारतीय फंलदाजांनी नेट्समध्ये चांगल्या पद्धतीने सामना केला आहे. भारतीय गोलंदाजांचा आम्ही सन्मान करतो. मात्र त्यांच्या गोलंदाजीचा सामना आम्ही केला आहे. त्यामुळे, भारतीय गोलंदाजांचा खडान खडा आम्हाला माहिती आहे, अर्थात त्यांच्या सर्व युकत्यांची कल्पना आम्हाला माहिती आहे,असे लॅंगर म्हणाले आहे.
तसेच, भारतीय संघाकडे जसप्रीत बुमराह सारखा विश्वस्तरीय गोलंदाज आहे. मोहम्मद शमीसारखा गोलंदाज आहे. याबद्दल आम्ही त्यांचा मान राखतो. मात्र आमच्या खेळाडू्ंनीही आयपीएल तसेच मागील काही स्पर्धेत या गोलंदाजांचा सामना केला आहे, असे लॅंगर म्हणाले आहे.

भारतीय संघाकडे वेगवान आणि फिरकी गोलंदाजी उत्तम आहे. माञ, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही खूप कसून तयारी केली आहे. आमच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजी माहिती आहे. प्रत्येक फॉर्मेटनुसार टीम इंडियाच्या गोलंदाजांसमोर तयार रहायला हवे आहे. हे आमच्या खेळाडूंना माहिती आहे, असे लॅगर म्हणाले.

आमचीही गोलंदाची भक्कम :लॅंगर यांनी ऑस्ट्रेलिया संघ भारतीय संघाशी लढायला परिपुर्ण असल्याचे म्हटले आहे.
लँगर यांनी त्यांच्या गोलंदाजीचे कौतूक केले आहे. आमची गोलंदाची आक्रमक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमच्या गोलंदाजीमध्ये खोली आहे. त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे, असे लॅंगर म्हणाले आहे. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड यासारखे धारदार गोलंदाज आमच्याकडे आहेत. तसेच जेम्स पॅटिन्सन, सीन एबोट आणि मायकेल नासरही तयार आहेत, असे लॅंगर म्हणाले आहे.

आमच्याकडे कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करण्याची क्षमता : रवी शास्त्री : मी भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीबद्दल आश्वस्त आहे. आमच्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी असे एकूण फॅब्युलस फाईव्ह गोलंदाज आहे. उमेश अनुभवी आहे. सतेच, नवदीप सैनी तरूण आहे. या सर्व गोलंदाजाकडे वेगाने गोलंदाजी करण्याचे कौशल्य आहे. या सर्व गोलंदाजांमध्ये कांगारुना त्यांच्याच घरात पराभूत करण्याची क्षमता आहे, असे रवी शास्त्री म्हणाले आहे.

मालिकानिहाय वेळापत्रक

एकदिवसीय (वनडे) मालिका

पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल

टी-20 मालिका

पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी

कसोटी (टेस्ट) मालिका

पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन