मार्नस लाबुशेन (६७*) आणि विल पुकोव्हस्की (६२)यांनी ठोकलेल्या धकाकेदार अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दमदार कामगीरी केली आहे. पहिल्या दिवासाखेर ऑस्ट्रेलियाने दोन गडी बाद १६६ धावा धावांची आघाडी घेतली आहे. दिवसाखेर लाबुशेन (६७) आणि स्मिथ (३०) नाबाद  आहे. तर, भारतीय संघाकडून सिराज आणि सैनी यांना प्रत्येकी एक एक विकेट घेत भारताला चांगली सुरूवात करून दिली आहे. सात षटकानंतर पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे, काही वेळ सामना थांबवण्यात आला होता. त्यामुळे पहिल्या दिवशी ५५ षटकांचा सामना खेळवण्यात आला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तीसऱ्या सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. तीसऱ्या सामन्यातील पहिल्या दिवसाची सुरूवात ऑस्ट्रेलियाची खराब झाली. सुरूवातीला दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सिराजने पाच धावांवर तंबूत पाठवलं. त्यानंतर भारतीय संघ या सामन्यात वरचढ होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. माञ, पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीने संयमी फलंदाजी केली. पुकोव्हस्कीला लाबुशेन याने उत्तम साथ दिली. पुकोव्हस्की-लाबुशेन यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी केली. अखेर पदार्पण करणाऱ्या सैनीने पुकोव्हस्कीला पायचीत करत ही जोडी फोडली. पुकोव्हस्कीने ६२ धावांची खेळी केली.
पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या स्मिथने लाबुशेनबरोबर संथ असेली धावसंख्या वाढवली. एकदिवसीय सामन्याप्रमाणे दोघांनी फटकेबाजी केली. पुकोव्हस्की बाद झाल्यानंतर लाबुशेन याने सामन्याची सुञ आपल्याकडे घेतली. लाबुशेन यानं कारकीर्दीतील नववे अर्धशतके झळकावले. स्मिथने त्याला चांगली साथ दिली. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद धावांची भागिदारी करत ऑस्ट्रेलियाची स्थिती आणखी मजबूत केली आहे.
भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आलेले नाही. बुमराह, अश्विन आणि जाडेजाची पाटी दिवसाखेर पाठकोरीच राहिली.