सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलिया संघाने जिंकवला, दुसरा सामना भारतीय संघाने जिंकवला तर तिसरा सामना अनिर्णियीत सुटला आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने ४०७ धावांचे आव्हान भारतीय संघाला दिले होते.  या धावांचा पाठलाग करताना भारताच्या हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरत सामना वाचवला. या अनिर्णित सामन्याबरोबरच भारताने कसोटी मालिकेतील १-१ ही बरोबरी कायम राखली.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुउपस्थितीत भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघसमोर तग धरेल का ? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. माञ, विराटच्या अनुउपस्थितीत भारतीय संघ जोरदार कामगीरी करतना दिसत आहे. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात लाजीरवाना पराभव स्विकारत दुसऱ्या सामन्यात हिशोब चुकता केला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात झटपट धावा करत भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक केले.  शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पंतने धुवाधार ९७ धावा कुटल्या. पुजारानेही ७७ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी कमाल केली. या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल २५९ चेंडू म्हणजेच ४३ षटके खेळून काढली आणि त्यात नाबाद ६२ धावांची भागीदारी केली. विहारी आणि अश्विन या जोडीने धमाकेदार कामगिरी करत तिसरा सामना अनिर्णियीत ठेवला. 

भारतीय संघाने केला 'हा' पराक्रम : भारतीय संघाने कसोटीच्या चौथ्या डावात १३१ षटके खेळली आहे. यात महत्त्वाची बाब म्हणजे तब्बल १८ वर्षांनंतर भारतीय फलंदाजांनी चौथ्या डावात १०० पेक्षा जास्त षटके खेळण्याची किमया केली आहे. या आधी २००२ साली भारतीय संघ लॉर्ड्सच्या मैदानावर खेळत होता. तेव्हा भारतीय संघाने कसोटीच्या चौथ्या डावात तब्बल १०९.३ षटके खेळली होती. त्या डावात भारताचा वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने शतक ठोकले होते. त्याच्या खेळीच्या जोरावरच भारताने ३९७ धावांपर्यंत मजल मारली होती, असा इतिहास आहे.