मुंबई : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 'गाबा'च्या मैदानावर कसोटी मालिकेतील चौथ्या सामन्यात पराभूत करत ३ गडी राखून ऐतिहासीक विजय मिळवला.  ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने मालिका जिंकत भारताने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी जिंकण्यास यश मिळवले. ऑस्ट्रेलियातील मालिका विजयानंतर भारतीय संघ मायदेशात परतला आहे. या खेळाडूंचे मुंबई विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. माञ, मुंबईत येण्याआधीच खेळाडूंसमोर कोरोनाच्या नियमांची आडकाडी निर्माण झाली होती. परंतु, अडचणीत सापडलेल्या खेळाडूंच्या मदतीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष  शरद पवार धावून गेले आहे. खेळाडूंना कुटुंबासोबत वेळ घालवता यावा, यासाठी चक्क शरद पवार यांनी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांना फोन करून खेळाडूंचा प्रश्न सोडवला आहे, अशी माहिती समोर येते आहे . शरद पवरांच्या मदतीमुळे  इंग्लड दौऱ्यापूर्वी खेळाडूंना आपल्या कुंटुंबासोबत वेळ घालवता येणार आहे.
ऑस्ट्रेलियाला नमवत भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ जिंकली. या अविस्मरणीय विजयानंतर भारतीय संघ मायदेशी परतला. संघातील टीम इंडियाचे प्रशिक्षक रवि शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शार्दूल ठाकूर, पृथ्वी शॉ मुंबई विमानतळावर परतले. मात्र, परदेशातून येत असल्याने खेळाडूंना क्वारंटाइन व्हावे लागणार होते. त्यातच पुढील महिन्यात इग्लंडसोबत मालिका सुरू होत असल्याने खेळाडूंचा वेळ क्वारंटाइनमध्येच जाणार आहे. अडचणीत असलेल्या खेळाडूंसाठी शरद पवार धावून गेले. शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून खेळाडूंना क्वारंटाइनमधून सूट देण्याबद्दल चर्चा करून खेळाडूंची या नियमांतून सुटका करण्यात यावी, असे पवारांनी ठाकरे यांना सांगितले होते. शरद पवारांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वारंटाइनच्या नियमातून वगळण्यात आले आहे. विमानतळावर RTPCR चाचणी करुन खेळाडूंना घरी जाण्याची परवानगी दिली आहे.
पाच फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लड यांच्यातील क्रिकेट मालिकेला सुरू होणार आहे. पुढचे सामने चेन्नईला होणार आहेत. त्याआधी खेळाडूंना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरन्टाइन व्हावे लागणार होते. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरन्टीन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळाडूंना विलगीकरणात न ठेवण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत फोन केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश महापालिकेला दिले होते, अशी माहिती सुञांनी दिली आहे.