मुंबई : कोरोनाचे संकट आता आयपीएलच्या १२  व्या पर्वावर घोंघावत आहे. कोलकाता संघा पाठोपाठ आता सीएसकेच्या संघात कोरोनाने हजेरी लावली आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. 2 मे रोजी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 
आज स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरु  यांच्यात सामना रंगणार होता. मात्र कोलकात्याच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने हा सामना पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेचे पीटीआयने वृत्त दिले आहे. दरम्यान, आयपीएलने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यातच आता कोरोनाने चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये प्रवेश केला आहे. सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन, गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी आणि एका बस क्लीनरचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याआधी गेल्या वर्षी 2020 मध्ये चेन्नईच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. सध्या आयपीएलचा अर्धा टप्पा पूर्ण झाला आहे. उर्वरित सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहेत. या दोन्ही शहरात कोरोनाचा आलेख चढता आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या चिंता वाढल्या आहे.