दुबई - किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा मुख्य फलंदाज ख्रिस गेल अद्याप एकही सामना खेळलेला नाही. गेलला संघात का संधी दिली जात नाहीये, याचे उत्तर मिळाले आहे. ख्रिसला अन्नातून विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. ख्रिस गेल सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.

ख्रिस गेल आयपीएलमध्ये आतापर्यंत एकही सामना खेळलेला नाही. यापूर्वी संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी ख्रिसला फूड पॉयझन झाल्याची माहिती दिली होती. आता ख्रिसने स्वत: रुग्णालयातून एक फोटो शेअर केला आहे.

ख्रिस फोटो शेअर करत म्हणाला, 'मी तुम्हाला सांगतो, की संघर्ष केल्याशिवाय मी खाली येणार नाही. मी युनिव्हर्सल बॉस आहे आणि ते कधीच बदलू शकत नाही. माझ्याकडून तुम्ही शिकू शकता. परंतु माझ्या गोष्टींचे अनुसरण तुम्ही करावे इतकाही मी मोठा नाही. माझी स्टाईल विसरू नका.'

ख्रिस कधी सामन्यात पुन्हा आपली कामगिरी दाखवणार हे अद्याप सांगण्यात येत नाही. अनिल कुंबळे यांनी देखील याबाबत काहीच सांगितलेले नाही.

[removed][removed]