दुबई: आयपीएलच्या १३व्या हंगाम गाजवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघला मोठा झटका बसला आहे. दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमधून एक आठवडा आऊट होणार आहे. पंतला हॅमस्ट्रिंग इंजरी असून तो पुढील एक आठवडा संघातून बाहेर असेल. दिल्लीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
आयपीएलच्या १३व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सचा संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. या संघाने आतापर्यंत झालेल्या ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळून प्ले ऑफमध्ये स्थान जवळ जवळ पक्क केले आहे. दिल्लीचा धडाकेबाज फलंदाज ऋषभ पंत आयपीएलमधून एक आठवडा आऊट होणार आहे. पंतला हॅमस्ट्रिंग इंजरी असून तो पुढील एक आठवडा संघातून बाहेर असेल. त्याची कमी दिल्लीला जाणवनार आहे. आता पंत पुढील काही सामने खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे.दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने ही माहिती दिली.