भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात कसोटी मालिकेतील तीसरा सामना सुरू आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर काही चाहते मागील दोन दिवसांपासून मोहम्मद सिराजला वर्णद्वेषावरून चिडवत आहे.  मोहम्मद सिराजने या प्रकाराची तक्रार कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर घातली. पंचांनी याची दखल घेत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला कळवले. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने एक परिपञक जारी करून भारतीय संघाची माफी मागत या संपूर्ण प्रकाराचा निषेध केला आहे. 
तिसऱ्या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला आहे. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतर चौथ्या दिवशीही चालू क्रिकेट सामन्यात काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली. सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना हा प्रकार घडला. त्याने सुरूवातीला दुर्लक्ष केले होते, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही, हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षारक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवून बाजूला बसवण्यात आले. या घडलेल्या सर्व  प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसले. त्यामुळे, सर्वांकडून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. 

[removed][removed]


ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेड बोर्डाने मागितली माफी : या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागत अशा चाहत्यांची गय केली जाणार नाही, असे म्हंटले आहे.  “भारतीय खेळाडूंबद्दल चाहत्यांनी केलेल्या वर्णभेदी टिपण्णीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत, ऑस्ट्रेलिया बोर्डाने म्हटले आहे. असे  शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करत आहे. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो”, असे ऑस्टेलिया बोर्डाने म्हटले आहे.

[removed][removed]