भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अंतिम सामना 10 सप्टेंबरपासून रंगणार आहे. या सामन्यावर कोरोना संकटाचे ढग घिरट्या घालू लागले आहे. बीसीसीआयच्या सूत्राने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले आहे की, सहाय्यक कर्मचारी सदस्य योगेश परमार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. त्यामुळे, मँचेस्टरमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षण सत्र रद्द केले आहे.

रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह : भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओ नितीन पटेल हे आधीच कोरोना पॉझिटिव्ह आहे अन् आता आणखी एक सपोर्ट स्टाफ मेंबर कोरोना बाधित झाल्याने भारतीय संघाची चिंता वाढली आहे.

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाग घेतला : असे सांगण्यात येते की, एका हॉटेलमध्ये पुस्तक लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर रवी शास्त्रींना कोरोनाची लक्षणे जाणव होती. बाहेरच्या पाहुण्यांनाही या कार्यक्रमाला येण्याची परवानगी होती. बीसीसीआयच्या एका सूत्राने असेही सांगितले - यूकेमध्ये कोणतेही बंधन नाही, शास्त्रींच्या पुस्तक लॉन्च पार्टी दरम्यान बाहेरच्या पाहुण्यांना परवानगी होती.