मुंबई : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी पुढे येते आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली  टी 20 वर्ल्ड कपनंतर कर्णधार पद सोडणार आहे. स्वत: विराटने ट्विट करत याबाबतचा खुलासा दिला आहे. त्यामुळे विराटनंतर भारतीय संघाचा पुढचा कर्णधार कोण असणार, याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागले आहे.
विराटने आतापर्यंत 95 एकदिवसीय आणि 45 टी 20 सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. भारताला विराटने या 95 वनडे सामन्यांपैकी 65 सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे. तर 27 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.  उर्वरित 1 सामना हा टाय झाला.  2 सामन्यांचा निकाल हा लागलाच नाही. विराटने आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 45 पैकी 29 मॅचमध्ये विजयी केले. तर 29 सामन्यात प्रतिस्पर्धी संघाने अस्मान दाखवले. वनडेप्रमाणेच टी 20 मध्येही 2 मॅचेसचा निर्णय लागला नाही.  

[removed][removed]