नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसी टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार नाही, असे स्पष्ट झालेले आहे. टी - 20 वर्ल्ड कप आता दुबईत होणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने आज आयसीसीला दिली आहे. लवकरच वर्ल्डकपचे वेळापत्रक आयसीसीकडून जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी दिली.  
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी 20 वर्ल्डकप भारताबाहेर होणार हे आधीच सांगितले जात होते. दुबईत ही स्पर्धा हलवली जाऊ शकते अशीही चर्चा होती, ती आज खरी ठरली. आयपीएल स्पर्धा संपताच टी - 20 वर्ल्डकप सुरु होईल असा अंदाज वर्तवीण्यात येत होता.

भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी सज्ज : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये नुकत्याच झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाची नजर टी -20 वर्ल्ड कप जिंकण्यावर असेल. गेल्या अनेक वर्षांपासून भारताला आयसीसीचं मोठं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. त्यामुळे टी-20 विश्वचषक जिंकून हा दुष्काळ संपविण्याचा प्रयत्न करेल. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ या स्पर्धेत आपले सामर्थ्य दाखवेल.