सिडनी - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आता या दौऱ्यात टीम इंडिया नव्या जर्सीत दिसणार आहे. भारताच्या दौऱ्याची सुरुवात वन डे मॅचच्या मालिकेने होत आहे. या मालिकेतील पहिली वन डे सिडनीत २७ नोव्हेंबर रोजी खेळली जाणार आहे. टीम इंडिया सिडनीत होत असलेल्या पहिल्या वन डे मॅचपासून नव्या जर्सीत दिसणार आहे.

टीम इंडियाची नवी जर्सी ही २८ वर्षांपूर्वीच्या भारताच्या जर्सीच्या रंगाशी मिळतीजुळती आहे. नव्या जर्सीत डाव्या बाजूला बीसीसीआयचा लोगो तर उजव्या भागावर किट स्पॉन्सर असलेल्या एमपीएल कंपनीचा लोगो असेल. जर्सीवर बीसीसीआय आणि एमपीएल या दोन्ही लोगोंच्या खाली आडव्या स्वरुपात मोठ्या आकारात बायजू कंपनीचा लोगो दिसेल आणि त्याखाली इंग्रजीत INDIA असा शब्द असेल. नवी जर्सी घालून भारताचा आघाडीचा फलंदाज शिखर धवनने सोशल मीडियावर फोटो शेअर केला. त्याचा हा फोटो बराच व्हायरल होत आहे.