बुधाबी: आयपीएलमध्ये आज मंगळवार सायंकाऴी 7:30 वा. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. दिल्लीने आतापर्यंत सर्व सामन्यात विजय मिळवला आहे तर हैदराबादने सर्व सामन्यात पराभव स्विकारला आहे. या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत.
स्पर्धेत आतापर्यंत भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली आहे. पण हैदराबाद संघाला अद्याप प्रभावी खेळी करता आली नाही. फलंदाजीसाठी संघातील टॉप ऑर्डरवर अवलंबून असल्याचे चित्र आहे. तर मधळ्याफळीतील फलंदाज कमकूवत दिसत आहेत. फक्त सलामीच्या फलंदाजांच्या जोरावर या संघाचे आयपीएलमधील आव्हान टीकण्याची शक्यता नाही.