पैठण - शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पिंपळाच्या झाडाने अतिक्रमण केल्याने या प्रवेशद्वाराच्या कमानीला तडे गेले आहे त्यामुळे ही कमान धोकादायक बनली आहे, तसेच पिंपळाच्या झाडाची मुळे ही कमानीच्या खोलवर रुजल्याने कोणत्याही वेळी प्रवेशद्वार कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

याबाबत माहिती अशी की, पैठणच्या सोंदर्यात भर घालणारी पैठण-शेवगाव रस्त्यावर पैठण नगरपरिषदेची भव्य प्रवेशद्वार आहे या स्वागत कमानीवर गेल्या पाच-सहा महिन्यांपासून कमानीच्या उजव्या बाजूला पिंपळाच्या झाड उगवले असून या झाडाची मुळे कमानीच्या खोलवर रुजल्याने स्वागत कमानीला धोकादायक निर्माण झाला आहे हे नगरपरिषद अतिक्रमण विभागाच्या दूर्लक्षामुळे हे झाड चांगलेच फोफावले आहे.

विशेष म्हणजे ही कमान रहदारीच्या रस्त्यावर असल्याने दिवसभर शेकडो वाहने या कमानीतून ये-जा करतात तसेच याच परिसरात मोठे खाजगी रुग्णालय, व्यापार पेठ शाळा, कॉलेज व कोचिंग क्लासेस असल्याने हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे भव्य प्रवेशद्वार असल्याने या कमानीच्या आडोश्याला नागरिक गप्पा मारीत उभे असतात कमानीच्या बाजूला खाजगी वाहतूक करणारे वाहने उभे असतात तसेच कमानीला खेटूनच मोठमोठी आस्थापना आहेत त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्या अतिक्रमणामुळे ही कमान कोणत्याही क्षणी कोसळून जिवीत व वित्तीय हाणी होण्याची भीती व्यापार्‍यांकडून व्यक्त केली जात आहे कमानीवर उगवलेले झाड तत्काळ नगरपरिषद प्रशासनाने तोडावे तसेच हे झाड पुन्हा येऊ नये म्हणून कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.