उमरगा : उमरगा नगरपालिकेमध्ये काँग्रेस-भाजपची सत्ता होती. नवीन सतेचे समीकरण नुसार राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना यांचे सुत जुळले. नव्या राजकीय फॉर्मुल्यामुळेच शुक्रवारी (दि.8) रोजी सर्वात कमी वयाच्या राजेश्वरी स्वामी अंगावर गुलाल पडला होता. पण चारच दिवसात त्या वैयक्तिक कारणास्तव रजेवर जात आहेत.
 पावणे पाच वर्षापूर्वी उमरगा नगर पालिकेची निवडणुक झाली होती. यावेळी नगराध्यक्ष निवडणूक ही जनतेतून होवून काँग्रेसच्या प्रेमलता टोपगे विजयी झाल्या. त्यांनी नगराध्यक्ष पदाचा कारभार सांभाळला, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचारच्या तक्रारीवरून प्रेमलता टोपगे यांना सहा वर्षासाठी बडतर्फ करण्यात आले. त्यानंतर प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार उपनगराध्यक्ष हंसराज गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता.  नियमानुसार नगरसेवकांमधून अध्यक्ष करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी निवडणूक कार्यक्रम 
जाहीर केला.पडद्यामागील हालचालीमुळे सेना व राष्ट्रवादी काँग्रेसने इतर मागासवर्गीय महिला उमेदवार असतानाही आपला उमेदवार दाखल न करता अप्रत्यक्षपणे भाजपला मदत केली. भाजपच्या नगरसेविका राजश्री स्वामी यांचा एकमेव अर्ज वैध ठरला. यामुळे 
त्या नगराध्यक्षा झाल्या.

नगराध्यक्ष पद औटघटकेचे : नगराध्यक्ष 3 महिन्याच्या रजेवर गेले आहेत. शुक्रवारी (दि 8 ) रोजी नगराध्यक्ष पदावर रुजू झाल्या त्यानंतर शनिवार व रविवार आला, सोमवार फक्त एक दिवस मिळाला. दि.9 च्या अंकात दै आदर्श गावकरीने नगराध्यक्ष रजेवर जाणार का?  असे भाकीत केले होते.