अंबाजोगाई : सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे.स्थगितीच्या निषेधार्थ अंबाजोगाई तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अंबाजोगाईत शहरात शुक्रवार, दिनांक दि.16 ऑक्टोबर रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला. शहरातील दोन्ही आमदारांच्या निवासस्थानी मोर्चातील सहभागी विद्यार्थीनींनी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन दिले. तसेच यावेळी आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज एकवटल्याचे दिसून आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षना संदर्भात काढण्यात येणार्या क्रांती मोर्चासाठी अंबाजोगाई तालुक्यातील मराठा समाजातील मराठा बंधू भगिणीनी जास्तीत-जास्त संख्येने सहभाग होण्याचे आवाहन अंबाजोगाई मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केले होते. अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील गाव, वाडी, वस्तीतून आरक्षणा संदर्भात शेकडो मराठा समाजातील तरुण, तरुणी एकत्र जमा झाले होते. शुक्रवार, दिनांक 16 ऑक्टोबर साकाळी 10.30 वाजता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व अन्नासाहेब पाटील चौकाच्या नामफलकास विद्यार्थिनींच्या हस्ते पुष्पहार, जिजाऊ वंदना घेऊन मोर्चार्स प्रारंभ झाला. मोर्चेकर्यांच्या हातात भगवे झेंडे, भगवा गमजा, तोंडाला मास्क, सॅनिटायझरचा वापर, फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करत जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे आदि घोषणा देत मोचा निघाला. निवेदन देण्यासाठी क्रांती मोर्चा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून विधानपरिषद आमदार संजय दौंड यांच्या निवासस्थानी जाऊन विद्यार्थीनीच्या हस्ते आरक्षण मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले.त्यानंतर क्रांती मोर्चा आचारसंहिता, शिस्त, संयम पाळत, घोषणा देत सावरकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मोंढा रोड, जुना पेट्रोल पंप, स्व.राजीव गांधी चौक, छत्रपती संभाजीराजे चौक या मार्गे केज विधानसभेच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी पोहोचेला. आमदार मुंदडा यांना मराठा समाजातील विद्यार्थीनीच्या हस्ते निवेदन देण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.

मोर्चाची आदर्श आचारसंहिता : क्रांती मोर्चातर्फे दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करत प्रत्येकाने कोविड संदर्भात खबरदारी घेतली, गळ्यात भगवा गमजा, हातात भगवा ध्वज घेतलेले मोर्चेकर्यामुळे शहरात भगवे वातावरण पहिला मिळाले. कोणत्याही प्रकारचा कचरा रस्त्यावर होणार नाही याची खबरदारी घेतली. मोरच्याच्या अग्रभागी निवेदन देणार्या विद्यार्थिनी व त्यांच्या मागे समाजातील माता भगिनी होत्या.सेल्फीची मनाई करण्यात आली होती.