उमरगा : जागतिक आरोग्य दिनानिमित्त बुधवारी येणेगुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असलेल्या बलसुर उपकेंद्र येथे कोवीड लसीकरण केंद्राचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प. सदस्य प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते तर उपविभागीय अधिकारी विठ्ठलराव उदमले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
बलसुर आरोग्य उपकेंद्राअंतर्गत बलसुरसह तीन तांडे, मल्लिकार्जुन वस्ती, कलदेव लिंबाळा, कडदोरा, समुद्राळ, व्हंताळ, आधी गावातील ग्रामस्थांना सदरील लसीकरण केंद्राचा मोठा उपयोग होणार आहे. वयोवृद्ध व आजारी, अपंग नागरिकांना याचा फायदा होणार आहे. प्रशासनाच्या वतीने बलसुर परिसरातील नागरिकांसाठी कोविड लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्यात आली. शंका न बाळगता सर्व ग्रामस्थांनी लसीकरणाचा वेळ व नियम पाळत लाभ घ्यावा, असे आवाहन जि.प. सदस्य प्रा. बिराजदार यांनी केले. यावेळी 125 जणांना लसीकरण करण्यात आले होते.        
यावेळी जि. प. चे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, प्रा.आ. केंद्र येणेगुरचे आरोग्य अधिकारी डॉ. जळकोटे, डॉ. गुंजोटे, सि.एच.ओ. डॉ. गाडेकर, आरोग्यसेविका सोनाली सगर पाटील, बरमदे एस.ए, एम.पी.डब्ल्यू घंटे, मिलन सुरवसे, अमोल जोशी, यांच्यासह सरपंच राजश्री नांगरे, उपसरपंच सुरेश वाकडे, ग्रा.पं. पवन पाटील, वागंबर सरवदे, आयुब पटेल, अतुल हिंगमीरे, विलास बिराजदार, अमर नांगरे, अक्षय पाटील, गिरीष गव्हाणे, माधव नांगरे, मालकुंजे, प्राचार्य कवलजीत बिराजदार, प्रशांत वाकडे, माधव घोडके, आशा कार्यकर्त्या आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.