उमरगा : शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वरचेवर वाढतच असून उमरगा येथे मंगळवारी तब्बल 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू  झाल्याची धक्कादायक घटना घडली. यामुळे जनतेत घबराट निर्माण झाली आहे.
कोरोनाचा प्रसार प्रचंड वेगाने होत आहे. रोज होणार्या तपासणीमध्ये दररोज 50-70 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. त्यामुळे या रुग्णांवर उपचार करणार्या येथील उपजिल्हा रुग्णालयात व 8 हॉस्पिटल आणी कोविड सेंटर मध्ये उपचार चालू आहेत. किमान 539 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातच मंगळवारी तब्बल 7 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला. या मध्ये जकापुर कॉलनी, मदनंद कॉलनी, काळे प्लॉट, कुन्हाळी, डाळिंब, एकुर्गा 2. पाच अंत्यसंस्कार मंगळवारी झालेले आहेत. बुधवारी दोन अंत्यसंस्कार होणार आहेत. दरम्यान, या घटनेने जनतेत दहशत पसरून घबराट निर्माण झाली आहे. उमरगा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कामाशिवाय कोणीही बाहेर पडु नये, असे आवाहन प्रशासनाने  केले आहे.

कोरोना रुग्णांची सद्यस्थिती
सक्रिय रुग्ण संख्या 539
जिल्हा उपरुग्णालयात 94
होम आयसोल्युशन 44
इदगाह कोविड केअर 24
शेंडगे हॉस्पिटल 21
शिवाई हॉस्पिटल 30
गजानन हॉस्पिटल 03
शिवाजी कॉलेज कोविड सेंटर 23
विजय क्लिनिक 10
माऊली हॉस्पिटल 13
मातृछाया हॉस्पिटल 08