लातूर : साखरउद्योगात सर्वात अद्ययावत आंतरराष्ट्रीय दर्जाचे तंत्रज्ञान वापरून लातूर नजीकच्या मळवटी येथे उभारण्यात आलेल्या ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड या प्रकल्पाच्या गळीत हंगामाचा शुभारंभ येत्या काही दिवसात होणार असून ज्यांचे हीत साधायचे आहे, त्या शेतकरी वर्गांच्या पदरात अधिकचे माप टाकण्याचा मुख्य उद्देश ठेवून हा प्रकल्प साकारला गेला आहे, तो उददेश साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे. ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड प्रकल्पाचा बॉयलर अग्नीप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते. 
लातूर तालुक्यातील मळवटी येथे उभारण्यात आलेल्या ट्वेंटीवन शुगर्स लिमिटेड प्रकल्पाचा बॉयलर अग्नीप्रदीपन अदिती अमित देशमुख यांच्या हस्ते आणि विलास साखर कारखान्याच्या अध्यक्षा वैशालीताई देशमुख, पालकमंत्री अमित देशमुख, अविर, अवान यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत विधीवत पूजा करून रविवार, दि. 3 जानेवारी रोजी संपन्न झाला.
अत्यंत साध्या आणि कौटंबिक कार्यक्रमात पार पडलेल्या कार्यक्रमास विकासरत्न विलासराव देशमुख कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे, कार्यकारी संचालक जे.डी.रणवरे, विलास कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, कार्यकारी संचालक जे.एस.मोहिते, कार्यकारी संचालक ए.आर. पवार, रेणा कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्षमण मोरे, कार्यकारी संचालक सुनिलकुमार देशमुख, संत शिरोमणी मारूती महाराजचे व्हा.चेअरमन श्याम भोसले, ट्वेंटीवन शुगर्स ली. जनरल डमीनस्ट्रेशन व्हा.चेअरमन विजय देशमुख, आणि बिझनेश हेड कौशल पौराना तसेच जनरल मैनेजर अशोक थोरात आदी उपस्थित होते. अमित देशमुख म्हणाले की, ट्वेंटीवन शुगर्स लि. हा प्रकल्प उभारण्याची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचीच होती, आणि या प्रकल्पाचे नावही त्यांनीच सुचविले आहे. ग्रामीण भागात आर्थिक क्रांती घडावी, शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाचे जीवनमान बदलावे हा उद्देश ठेवून साहेबांनी मांजरा कारखान्याची उभारणी केली. हेतू जनकल्याणाचा असल्यामुळे ईश्वर कृपेने हा प्रकल्प उत्तम चालला आणि आजही चालतो आहे. ट्वेंटीवन शुगर्स युनिट 2 हा प्रकल्प नुकताच या परीवरात सहभागी झाला असून परभणी जिल्हयातील सोनपेठ तालुक्यातील साईखेडा येथे असलेल्या या प्रकल्पात चालू गळीत हंगामात 2 लाख मेटन पेक्षा अधिकचे गाळप झाले आहे. 2500 हजार मेटन प्रतिदिन गाळप क्षमता असलेल्या प्रकल्पात सदया प्रतिदिन 4 हजार 500 मेटन ऊसाचे गाळप होत आहे. यामुळे तो कारखाना मांजरा परीवारातील स्पर्धेत उतरला आहे. 
या कार्यक्रमास गोविंद देशमुख, विपीन देशमुख, आलोक सेहगल, अनिल महेंद्रकर, नितीन भोयटे, एस.के.तुरे पाटील, एन.आर.मोरे, पी.एस.ठोंबरे, प्रदीप सक्सेना, एफ.बी.येरगणी, सागर मिसाळ, सोमनाथ शिवपुरे, संभाजी रेड्डी, सुपर्ण जगताप, राधेश्याम देशमुख, कल्याणकर, डी.एस.कदम, अनंत पवार, श्रीराम पाटील, मिलींद पाटील मांजरा परिवारातील सर्व संचालक, मेसर्स इजॅकचे क्षिरसागर व सर्व अधिकारी, कर्मचारी, पुरवठादार, उपस्थित होते.