परभणी :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते विजय वरपूडकर यांनी मंगळवारी (दि.12) दुपारी मुंबईतील प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या सोहळ्यात भाजपमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील हे उपस्थित होते.
ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, माजी आमदार मोहन फड, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रमोद वाकोडकर हे यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यात ज्येष्ठ नेते वरपुडकर, माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. विलास देशपांडे, माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, माजी पंचायत समिती सभापती सूरेश गिरी, हनुमानदास वैष्णव, सुभाष देशमुख, उत्कर्ष विजय वरपुडकर, माणिकराव भोसले, निवृत्ती पाटील काळबांडे, मधुकर मोहिते, शंकर मोरे, अंबादासराव कदम, नामदेवराव डुबे, रामदास डुबे, श्रीनिवास देशमुख, सुभाष यादव, राधाकिशन कदम, केशव थोरवट, दत्तात्रय देशमुख, आनंद देशमुख, संग्राम हेडगे, भानुदास राखुंडे, बाबासाहेब रनेर, सुभाष गरुड, गोविंद डुकरे, शाम काकानी, रणजित बिसाड व गौरव हरजुबे या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वरपुडकर यांच्यासह या सर्वांचे पुष्पगुच्छ देवून स्वागतकेले. परभणी जिल्हा भक्कमपणे उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला.