लातूर : निलंगा तालुक्यातील कासारसिरशी परिसरात गुरूवारी रात्री 10 तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. या प्रकाराची सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा शिवाय जिल्हयातील शासकीय आणि खाजगी रूग्णालयात पॉवर बॅकअपची व्यवस्था तपासून घ्यावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित  देशमुख यांनी दिले आहेत.  
गुरूवारी रात्री निलंगा आणि परीसरात वादळी पाऊस झाला. या दरम्यान कासारसिरशी परिसरातील वीज पूरवठाखंडीत झाला तो सकाळ पर्यंत सुरू झाला नव्हता. कोवीड 19 प्रादूर्भावाच्या काळात एवढा दिर्घकाळ वीजपूरवठा खंडीत रहाणे ही बाब अतिशय गंभीर आहे. कासारसिरशी येथे ग्रामिण रूग्णालयही आहे, या व इतर रूग्णालयाच्या दृष्टीने वीज पूरवठा खंडीत होणे अडचणीचे ठरते. त्यामुळे कासारसिरशी परिसरात 10 तास विजपूरवठा खंडीत होण्याची बाब पालकमंत्री अमित देशमुख यांनी गार्भीयाने घेतली असून त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. वादळी पासवामुळे वीज खंडीत होवू शकते परंतु नंतर 10 तास हा पूरवठा सुरळीत न होणे गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वीज पुरवठा सुरळीत होण्यास एवढा उशीर का झाला, याची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. मे महिन्याच्या शेवटी आणि जूनमध्ये पुन्हा वादळी वारे आणि पावसाची शक्यता असल्याने वीज पुरवठा खंडित होऊ नये याची दक्षता महावितरणने घ्यावी, त्याच बरोबर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयात पुरेसे पावर बॅकअप आहे किवा नाही याची तपासणी करून त्रुटी असलेल्या ठिकाणी तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकार्यांना त्यांनी दिले आहेत.